मुंबई बंदर हे भारताच्या पश्चिम किना-याच्या जवळजवळ मध्यावर (अक्षांश 18° 54’ उत्तर, रेखांश 72° 49' पूर्व) वसलेले आहे. मुंबई बंदराच्या पूर्वेला कोकणच्या मुख्य भूमीने आणि पश्चिमेला मुंबई बेटाव्दारे संरक्षण दिले असून सुमारे 400 चौरस किलोमीटरच्या नैसर्गिक खोल पाण्याच्या बंदराची देणगी मिळाली आहे. बंदरामधील खोल पाण्यामुळे वर्षभर जलवाहतुकीसाठी पुरेसा निवारा मिळतो. उत्तरेला प्राँग्ज दिपगृह (लाइटहाऊस) 27 किलोमीटर दृश्यमान आणि दक्षिणेला केनेरी दीपगृह (लाइटहाऊस) 29 किलोमीटर दृश्यमान यामुळे बंदराकडे जाणारे मार्ग चांगले प्रकाशमान आहेत. बंदराचे प्रवेशव्दार दक्षिण-पश्चिमेकडून प्राँग्ज रीफ आणि थळ रीफ यांच्या दरम्यान, मुख्य भूमीपासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर दक्षिण पूर्वेस आहे. |
|
मुख्य नेव्हिगेशनल हार्बर चॅनेलचा मोठा भाग हा एक नैसर्गिक खोल पाण्याचा फेअरवे आहे. चॅनेलचे 11 मीटर खोलीकरण करण्यात आले आहे. 3.3 मीटरच्या पाण्याच्या सरासरी भरतीसह, चॅनेल मोठया संख्येने मालवाहू जहाजे, प्रवासी जहाजे आणि खोल (ड्राफ्टेड) टँकरची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे. चांगली प्रकाश व्यवस्था असल्याने बंदरावर चोवीस तास बोटींना येजा करण्याची परवानगी आहे. सुक्या मालाची हाताळणी सागरी तेल टर्मिनल्स पिर पाव येथे रसायने आणि पेट्रोलियम पदार्थ हाताळले जातात. येथे 3 जेटी आहेत. जुने पिर पाव, नवीन पिर पाव (NPP) आणि नवीन पिर पाव 2 (NPP2). जुने पिर पाव येथे फक्त ल्युब/बेस ऑइल बार्जेस हाताळले जातात. रसायने, LPG आणि इतर पेट्रोलियम उत्पादने नवीन पिर पाव आणि नवीन पिर पाव 2 वर हाताळली जातात. सर्व जेटी पाइपलाइनच्या जाळ्याव्दारे तेल शुद्धीकरण प्रकल्प/साठवणुकीच्या टाक्यांशी जोडलेल्या आहेत. बंदर सुकी गोदी (ड्राय डॉक) माल साठवणी (स्टोरेज) |
S. No. | Title | Link Type | File Size | Last Updated |
---|---|---|---|---|
1 | बंदराची मांडणी | File Link | (515.66 KB) | 15 January 2024 |
2 | गोदीचा आराखडा | File Link | (3.67 MB) | 15 January 2024 |